यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद

पुणे(दिव्यांग उपडेट)

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद करण्यात आले आहे.

परिषदेचा उद्देश आहे की दिव्यांग व्यक्तींच्या गरजांवर आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, सहाय्यक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणे आणि स्टार्टअप्स, उद्योजक, शासन, उद्योगक्षेत्र व सामाजिक संस्थांमध्ये सहकार्य वाढविणे.

या परिषदेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, नाविन्यपूर्ण उपाय, डिजिटल सुलभता आणि महाराष्ट्रातील नवकल्पनांचे भविष्य. या विषयांवर संवादात्मक सत्रे घेण्यात येतील. तसेच यानिमित्ताने स्टॉल सहभाग: दिव्यांगांसाठी उपयुक्त उत्पादने, सहाय्यक उपकरणे, तंत्रज्ञान व सेवांचे सशुल्क प्रदर्शनकरिता संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

या परिषदेमध्ये दिव्यांग व्यक्ती, पालक, स्वयंसेवी संस्था, स्टार्टअप्स, उद्योजक, विद्यार्थी, संशोधक, तंत्रज्ञान कंपन्या, CSR संस्था व सेवा पुरवठादार. आदि सहभागी होणार आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कृपया उपस्थित राहावे ही विनंती.

दिनांक:१८ नोव्हेंबर २०२६
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ४
स्थळ: मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

नाव नोंदणीसाठी संपर्क:
मानिषा खिल्लारे- 9022716913
📧 hdsc@chavancentre.org

परिषद सहभाग किंवा स्टॉल नोंदणीसाठी संपर्क साधताना आपले नाव, संस्थेचे नाव आणि सहभागाचा प्रकार नमूद करावा.

परिषदेला येण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://forms.gle/qEKYa9P2SmAsWqBR8

सशुल्क स्टॉल नाव नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा – https://forms.gle/9q3WodocNi9AxbLC6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *